आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नागपुर : महापौर किशोरी पेडणेकर आणि भाजपा नेते आशिष शेलार यांच्यातील वाद पोलीस स्टेशनपर्यंत पोहचला. पेडणेकर यांच्याविरोधात अपशब्द वापरल्याप्रकरणी शेलार यांच्यावर मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. शेलार यांच्यावर झालेल्या तक्रारीनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
हे ही वाचा : 2024 मध्ये उद्धव ठाकरेच पुन्हा मुख्यमंत्री होतील; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचा विश्वास
भाजपाचा कुठलाही नेता विशेषत: आशिष शेलार हे कोणतेही महिलेबद्दल अभद्र किंवा चुकीचा शब्द वापरू शकत नाहीत. महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविषयी अजिबात नाही. काल झालेल्या पत्रकार परिषद किंवा प्रेस नोटमध्ये याचा अतिशय चुकीचा अर्थ काढून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आशिष शेलार शिवसेनेविरूद्ध आक्रमक बोलतात. त्यांना शांत करण्यासाठी अशा प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आलाय का? असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
दरम्यान, मी ही एकदम भक्कमपणे सांगू शकतो की, महापौरांबद्दल किंवा इतर महिलांबद्दल आम्हाला आदर आहे. आशिष शेलार किंवा भाजपा कोणीही त्यांच्याबद्दल वाईट किंवा चुकीचे शब्द वापरू शकत नाहीत, असा दावाही फडणवीस यांनी केला आहे.
महत्वाच्या घडामोडी –
पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांना लिहिलं भावनिक पत्र, म्हणाल्या…
मोठी बातमी! भाजप नेते आशिष शेलार यांच्यावर गुन्हा दाखल; किशोरी पेडणेकरांनी केली पोलिसात तक्रार
केवळ लष्करच नव्हे, तर अवघा देश या धक्कादायक घटनेमुळे हादरला- राज ठाकरे