आशिष शेलारांनी घेतली राज ठाकरेंची भेट, भाजप-मनसे युतीवरून पुन्हा चर्चांना उधाण

0
695

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : भाजप आमदार आशिष शेलार यांनी आज मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यामुळे भाजप-मनसे युतीवरून चर्चांना उधाण आलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मनसे-भाजप युतीवरून चर्चा जोरदार रंगल्या होत्या. मात्र राज ठाकरे यांनी आगामी महापालिका निवडणुकीत मनसे कार्यकर्त्यांना स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाण्याचे आदेश दिले होते. महापालिका निवडणुकीसाठी मनसेनं स्वबळाचा नारा दिला होता.

हे ही वाचा : राष्ट्रवादीचा मनसेला आणखी एक धक्का; रूपाली पाटील यांच्यानंतर आता ‘या’ नेत्यानं हाती बांधलं घड्याळ

दरम्यान, शेलार अनेकदा राज ठाकरेंच्या भेटीसाठी कृष्णकुंजवर जायचे, मात्र त्यावेळी भाजपचा काय निरोप घेऊन ते आले, अशा चर्चाही रंगायच्या. त्यामुळे आताही आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर ही सदिच्छा भेट असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

महत्वाच्या घडामोडी –

सोमय्यांनी फडणवीसच नव्हे तर अमित शहांच्या नावेही कोट्यवधींची वसुली केली; संजय राऊतांचा मोठा बाॅम्बस्फोट

“…होय आम्ही भ्रष्टाचार केला”; उदयनराजेंचं शिवेंद्रराजेंना प्रत्युत्तर

रोहित शर्मा-सुर्यकुमार यादवची मॅचविनिंग खेळी, भारताचा वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here