Home महाराष्ट्र आशिष शेलार हे भाजप व संघाचे गुलाम; अमोल मिटकरींचा टोला

आशिष शेलार हे भाजप व संघाचे गुलाम; अमोल मिटकरींचा टोला

मुंबई : दिल्लीमध्ये शेतकरी आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीने संपुर्ण देशातील वातावरण तापलं आहे. दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनावर आज राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. अशातच भाजपचे नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली. यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आशिष शेलार हे भाजप व संघाचे गुलाम असून केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्याचे मूकपणे समर्थन करीत आहेत. दिल्लीच्या हिंसाचारा मागे भाजपचा कार्यकर्ता दीप सिद्धू असल्याचा आरोप शेतकरी का करत आहेत याचे उत्तर शेलार यांनी दिले नाही.,असं ट्विट करत मिटकरी यांनी शेलारांना प्रत्युत्तर दिलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

BCCI अध्यक्ष साैरव गांगुलीची प्रकृती पुन्हा बिघडली; रूग्णालयात केलं दाखल

दिल्लीत हिंसाचार करणारे शेतकरी नाहीत, ते तर देशद्रोही- सदाभाऊ खोत

केंद्र सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे- अण्णा हजारे

…हे केंद्र सरकारला सांगतायत की बळाचा वापर करू नका- प्रविण दरेकर