Home महाराष्ट्र तुमचा भाऊ म्हणून मी सदैव तुमच्यासोबत; जयंत पाटलांचं परिचारिकांना भावनिक पत्र

तुमचा भाऊ म्हणून मी सदैव तुमच्यासोबत; जयंत पाटलांचं परिचारिकांना भावनिक पत्र

मुंबई : आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनाच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे नेते आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी परिचारिकांना भावनिक पत्र लिहलं आहे.

सर्व परिचारिका भगिनींना, सविनय नमस्कार, सर्वप्रथम तुम्हाला जागतिक परिचारिका दिनाच्या शुभेच्छा. जगात प्रत्येक व्यक्ती अर्थप्राप्तीसाठी काही काम करत असते, पण खूप कमी कामे अशी असतात जी नोकरी देखील असते आणि समाजाची सेवा देखील.परिचारिका म्हणुन नोकरी हा त्या सेवेचाच भाग आहे. असं पत्र जयंत पाटील यांनी परिचारिकांना लिहिलं आहे.

स्वत:चा जिव धोक्यात घालून तुम्ही समाजाची सेवा करत अहात. तुमच्या मेहनतीमुळेच हे संपूर्ण जग Covid19 च्या या अत्यंत वाईट अशा काळातून बाहेर पडेल, असं जयंत पाटील म्हणाले.

दरम्यान, या साऱ्या काळात तुम्ही तुमची आणि तुमच्या सर्व कुटुंबियांची जरुर काळजी घ्या. तुमचा भाऊ म्हणून मी तुमच्यासोबत आहे, असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

करोनामुक्ती लढ्यातील परिचारिकांच्या सेवेची मानवतेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल- अजित पवार

भाजपला सोडचिठ्ठी देण्यावरुन एकनाथ खडसेंचा मोठा खुलासा; म्हणाले..

काँग्रेसने सचिन सावंत यांना उमेदवारी द्यायला हवी होती; संजय राऊतांनी व्यक्त केली खंत

…पण हा माणूस फक्त स्वतःच्या पदासाठी फिरतोय; निलेश राणेंच उद्धव ठाकरेंवर टीकस्त्र