स्वत:वर हल्ला झाला म्हणून, काही लोक ओठाखाली साॅस लावून फिरतात आणि…; संजय राऊतांचा सोमय्यांना टोला

0
289

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर शनिवारी खार पोलीस स्टेशनसमोर शिवसैनिकांनी हल्ला केला. यात सोमय्या यांच्या हनुवटीला दुखापत झाली असल्याचं व्हिडिओत दिसत होतं. मात्र सोमय्या यांच्या हनुवटीला झालेली जखम कृत्रिम असण्याची शंका सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून करण्यात येत आहे. यावरून आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

स्वत:वर हल्ला झाला म्हणून काही जण ओठाखाली टोमॅटो सॉस लावून फिरतात आणि राष्ट्रपती राजवटीची मागणी करत आहेत, असा टोला संजय राऊतांनी यावेळी किरीट सोमय्यांना लगावला. ते माध्यमांशी बोलत होते.

हे ही वाचा : तब्बल 18 दिवसांच्या कोठडीनंतर गुणरत्न सदावर्तेंची सुटका, बाहेर येताच म्हणाले…

दरम्यान, आज विरोधी पक्ष दहशतीखाली आहे. मानवी हक्कांसंदर्भात जागतिक पातळीवर चिंता व्यक्त केली आहे. ते कोणत्या हिटलरशाहीविषयी बोलत आहेत हे पहावं लागेल, असंही संजय राऊतांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

“भाजपचा मनसेला धक्का; ‘या’ माजी मोठ्या नेत्यानं केला भाजपमध्ये प्रवेश”

“Breaking News! राज ठाकरेंच्या सभेपूर्वीच औरंगाबादमध्ये आजपासून जमावबंदी लागू”

राणा दाम्पत्यानं दिलेल्या आव्हानानंतर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलं जोरदार उत्तर, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here