आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे :आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय नेत्यांनी पक्षाची ताकद वाढविण्यासाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारही मैदानात उतरले आहेत. यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार आणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधलाय.
चंद्रकांत पाटील यांनी आगामी महापालिका जिंकण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शनही केले. सेवा हेच संघटन हे वाक्य लक्षात ठेवून जनतेच्या समस्या सोडवा. सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोचवा. लोक उपकार विसरत नाहीत. त्यामुळे सेवेचा संकल्प करा. याच सेवांच्या माध्यमातून महापालिकेवर सत्ता येईल. पालिकेत भाजपचे 97 नगरसेवक आहेत. आगामी निवडणुकीत हे सर्व निवडून येतील आणि आणखी 25 नगरसेवक निवडून कसे येतील, याकरिता युद्ध पातळीवर तयारी करण्याचं आवाहनही चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
हे ही वाचा : विरोधी पक्षाची अवस्था बिघडलेल्या बबड्यासारखी झालीये; नीलम गोऱ्हेंचा टोला
आगामी निवडणुकीत भाजपला पराभूत करणे सोपे नाही. छोटे पवार तिथं कमी पडले, हे लक्षात आल्याने आता मोठे पवार पुण्याच्या मैदानात उतरले आहेत, असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.
दरम्यान, यावेळी प्रकाश जावडेकर यांच्यासह इतर नेत्यांची देखील भाषणे झाली. यावेळी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह आमदार, महापालिकेतील पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
महत्वाच्या घडामोडी –
पुण्यात शिवसेना-राष्ट्रवादी येणार एकत्र?; चर्चांना उधान
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचं फेसबुक पेज अज्ञात व्यक्तीकडून हॅक; सायबर सेलकडे तक्रार
“शिवसेनेशी बंडखोरी केलेल्या माथेरानच्या’ त्या’ नगरसेवकांचा फैसला आता जिल्हाधिकाऱ्यांच्या हातात”