“लाचखोर नवऱ्याच्या बायकोचे नाव वाघ असले म्हणून, मांजर वाघ होत नाही”

0
329

मुंबई : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. मी वाघ आहे आहे, मी काय आहे ना हे तुमच्या बापाला जाऊन विचारा, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं होतं. यावर आता मेहबूब शेख यांनी उत्तर दिलं आहे.

लाचखोर नवऱ्याच्या बायकोचे नाव वाघ असले म्हणून मांजर वाघ होत नाही. तुमच्या नवऱ्याने कशात आणि कोणत्या प्रसंगात लाच घेतली यावर अधिक स्पष्टपणे बोला. मेलेल्या माणसाच्या वारसांना नोकरी आणि मदत देण्यासाठी किशोर वाघ यांनी लाच घेतली, हे तुम्ही राज्यातील जनतेला सांगा, असा टोला मेहबूब शेख यांनी यावेळी लगावला.

दरम्यान, आम्ही पवारांचे कार्यकर्ते आहोत म्हणून काही बंधने पाळतो, नाही तर असल्या 56 चित्रा वाघ आल्या तरी त्यांच्या पुढची भाषा मेहबूब शेख बोलू शकतो, मेहबूब शेख कशालाच घाबरत नाही, असा सज्जड दमही त्यांनी यावेळी दिला.

महत्वाच्या घडामोडी –

शिवसेना आणि संजय राऊत तोंडावर पडले; बेळगाव निकालानंतर निलेश राणेंचा घणाघात

“हिंदुत्वाला विरोध करणाऱ्या काँग्रेसशी हातमिळवणी करून लाज वाटली नाही का?

माझा मुलगाही खोटारड्या वाघांबरोबर नेहमी खेळतो; मेहबूब शेख यांनी चित्रा वाघ यांना डिवचलं

…तरच राज्यात सत्ताबदल होऊ शकतं; रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here