आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
बीड : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.
हे ही वाचा : ‘हे’ सरकार गेंड्याच्या कातडीचं झालं आहे; चंद्रकांत पाटलांची टीका
त्या पालकमंत्री असताना त्यांनी त्यांच्या काळात विकास कामे झालीच नाहीत, जी झाली ती अर्धवट आहेत. आता ही अर्धवट विकास कामे पूर्ण करण्याची जबाबदारी आमच्यावर आली, अशी अप्रत्यक्ष टीका धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंवर केली. ते पंचायत समितीच्या नवीन इमारतीच्या अनावरण प्रसंगी बोलत होते.
दरम्यान, अनेक दिवस झाले रेल्वेचे काम रखडले होते. मात्र आता रेल्वेच्या कामासाठी आम्ही निधी उपलब्ध करून दिला आहे. येत्या काही दिवसांतच या मार्गावरून सुपर फास्ट ट्रेन धावेल असं त्यांनी म्हटलं आहे. जिल्ह्यात रेल्वे कधी येणार याची वाट पाहात अनेक पिढ्या गेल्या, मात्र आता तुमचे स्वप्न लवकरच साकार होणार असल्याचं धनंजय मुंडेंनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
‘हे’ सरकार गेंड्याच्या कातडीचं झालं आहे; चंद्रकांत पाटलांची टीका
“भाजपच्या ‘या’ भूमिकेला शिवसेनेने दिला पाठिंबा”
एसटीचं विलिनीकरण डोक्यातून काढून टाका, एसटीचं विलिनीकरण होणार नाही- अजित पवार