मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा देताच शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पायाखालची जमीन सरकली आहे, असा घणाघात भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केला.
आघाडी तोडायला कोणीही गेलं नाही. तेच एकमेकांवर आरोप करत आहेत. संपूर्ण कोव्हिडच्या काळात या तिन्ही पक्षांनी एकत्र बसून काय निर्णय घेतला? यांना आपापसातल्या भांडणातून फुरसत मिळत नाही. त्यांच्यात वाद आहेत., अशी टीका प्रवीण दरेकरांनी यावेळी केली. ते टी.व्ही.9 मराठीशी बोलत होते.
दरम्यान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून पाळत ठेवली जात असल्याचा आरोप दरेकरांनी यावेळी केला. तसेच त्यामुळे आघाडीत विसंवाद असून मविआ सरकारमध्ये अविश्वासाचं वातावरण असल्याचं स्पष्ट होतं, असा दावा प्रवीण दरेकर यांनी यावेळी केला.
महत्वाच्या घडामोडी –
“कोरोना संकट काळात उद्धव ठाकरेंसारखा मुख्यमंत्री झाला नसता, हे त्यांनी आपल्या कार्याने दाखवून दिलं”
देशात जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे; रामदास आठवले यांची मागणी
सहकार खातं अमित शहांकडे गेल्यानं घाबरण्याचं कारण नाही- संजय राऊत
“केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान न देऊन भाजपने उदयनराजेंचा अवमान केला”