आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू हे आज तब्बल 10 महिन्यानंतर तुरुंगाबाहेर आले आहेत. 1988 च्या रस्त्यावर झालेल्या वाद आणि हाणामारीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नवज्योत सिंग सिद्धू यांना 19 मे 2022 रोजी 1 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.
मात्र, तुरुंगातील चांगल्या वर्तवणुकीमुळे 2 महिने आधीच सिद्धू यांना सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिद्धूंच्या स्वागताला काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात तुरुंगाबाहेर आले होते. तुरूंगाबाहेर आल्यानंतर सिद्धू यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
हे ही वाचा : संभाजीनगर आणि मालवणी दंगलप्रकरणावर आता शरद पवारांनी पहिल्यांदाच केलं भाष्य, म्हणाले…
पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याचं षड्यंत्र रचलं जात असून, अल्पसंख्याकांना लक्ष्य करणअयात येत आहे. पंजाबला कमकुवत करण्याचं काम केलं जात आहे. देशात लोकशाही राहिली नसून, हुकूमशाही आली आहे. पण, देशात एक क्रांती आली आहे. त्याचं नाव राहुल गांधी आहे. पंजाब ही देशाची ढाल आहे. आज ती ढाल तोडण्याचं प्रयत्न सुरू आहेत,” असा आरोपही नवज्योत सिंग सिद्धू यांनी यावेळी केला.
महत्त्वाच्या घडामोडी –
“शिंदेंकडे गेलेले अनेक आमदार, उद्धव ठाकरेंकडे लवकरच परत येणार”
राष्ट्रवादीला मोठा धक्का; ‘हा’ मोठा नेता करणार भाजपमध्ये प्रवेश
उध्दव ठाकरेंच्या अडचणीत वाढ; ठाकरे गटाच्या ‘या’ मोठ्या नेत्यासह 32 जणांवर गुन्हा दाखल