देवेंद्र फडणवीस पक्षात असेपर्यंत न्याय मिळणार नाही, म्हणून पक्ष सोडला- एकनाथ खडसे

0
148

जळगाव : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जोपर्यंत पक्षात आहेत, तोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही. म्हणून मी पक्ष सोडला, असं म्हणत भाजपला रामराम करत राष्ट्रवादीत प्रवेश करणारे नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते टी.व्ही.9 मराठीशी बोलत होते.

मी वारंवार वरिष्ठांकडे तक्रारी केल्या. मी जे.पी. नड्डा यांना भेटलो, तासभर चर्चा केली. अमित शाह, मोदी, नितीन गडकरी यांनाही भेटलो. पण देवेंद्र फडणवीस हाच अंतिम निर्णय पक्षात असल्याने त्यांनी घेतलेला विधानसभेच्या तिकीटाचा निर्णय असो किंवा इतर कोणाताही निर्णय असो, शेवटी देवेंद्र फडणवीस सांगतील तेच होत गेलं आणि फडणवीस जोपर्यंत पक्षात आहेत, तोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही अशी माझी भावना झाली. या व्यक्तीगत कारणामुळे किंवा व्यक्तीगत छळामुळे मी हा पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अलिकडच्या काळात माझ्यासोबत व्यक्तीगत घटना घडल्या आहेत त्या त्रासदायक होत्या. माझ्या चौकश्या केल्या. मला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. याचा मला प्रचंड मनस्ताप झाला, असं यावेळी एकनाथ खडसे म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

उपमुख्यमंत्री अजित पवारांना कोरोनाची लक्षणं; होम क्वारंटाइन होण्याचा निर्णय

अजित पवारांसोबत पहाटे शपथविधी ही नैतिकता, आणि…- एकनाथ खडसे

“पंकजा मुंडे जर शिवसेनेत आल्या तर त्याचा आम्हाला आनंद आहे”

भाजपमधील सामूहिक नेतृत्त्व संपलंय, आता एकाधिकारशाहीने निर्णय घेतले जातात- एकनाथ खडसे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here