Home महाराष्ट्र “…त्यामुळे सर्व महापालिकेवर भाजपचाच महापौर होणार”

“…त्यामुळे सर्व महापालिकेवर भाजपचाच महापौर होणार”

मुंबई : आतापर्यंत युतीमध्ये लढल्यामुळे पालिका निवडणुकांनमध्ये  नेमही शिवसेनेचा महापौर झाला. यापुढे शिवसेना आणि भाजप वेगळी निवडणूक लढणार आहेत. त्यामुळे राज्यातील सर्व महापालिकांवर भाजपचाच महापौर निवडून येणार, असं वक्तव्य भाजप नेते आशिष शेलार यांनी केलं आहे. ते टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते.

“महाविकास आघाडीमध्ये पहिल्यापासूनच बिघाड आहे. ही बिघडलेली आघाडी आहे. यांनी राज्याला बिघडवू नये एवढीच आमची इच्छा आहे. आम्ही आतापर्यंत युतीमध्ये निवडणुका लढवल्यामुळे प्रत्येक महापालिकेत शिवसेनेचा महापौर असायचा, असं म्हणत यांनतर आम्ही स्वतंत्रपरणे लढणार आहोत. त्यामुळे प्रत्येक महापालिकेवर भाजपचाच महापौर होणार, असा विश्वास आशिष शेलार यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, भाजपला सोडून शिवसेनेत प्रवेश केलेले नाशिकचे वसंत गीते आणि सुनिल बागुल यांच्या शिवसेना प्रवेशावरही आशिष शेलार यांनी टीका केली.

महत्वाच्या घडामोडी-

“…तर हे सरकारच केंद्रामध्ये उचलून ठेवा”

“भंडारा घटनेवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सरकारकडे केली ‘ही’ महत्त्वाची मागणी”

“अशोक चव्हाण यांचं मराठा आरक्षणासंदर्भातील वक्तव्य हे अज्ञान आहे”

मुख्यमंत्र्यांनी ‘त्या 19 मालमत्तां’ची माहिती लपवली; किरीट सोमय्यांचा आरोप