Home महाराष्ट्र “फडणवीस मुख्यमंत्री झाले नाहीत म्हणून कितीतरी भाजपाचे नेते ढसाढसा रडायला लागले”

“फडणवीस मुख्यमंत्री झाले नाहीत म्हणून कितीतरी भाजपाचे नेते ढसाढसा रडायला लागले”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं. आणि एकनाथ शिंदे यांचं सरकार स्थापन झालं. आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार टोलेबाजी केली.

हे ही वाचा : आषाढी एकादशी दिवशी विठूरायाच्या महापूजेनंतर हे सरकार सत्तेत राहणार नाही; राष्ट्रावादीच्या ‘या’ नेत्याचं भाकीत

“देवेंद्र फडणवीस टीव्हीवर बोलत होते आणि त्यांनी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी एकनाथ शिंदे घेतील सांगितलं तेव्हा ‘पिन ड्रॉप सायलन्स’ झाला. कितीतरी भाजपाचे नेते तर ढसाढसा रडायलाच लागले. कुणाला काही कळेनाच. सगळ्या महाराष्ट्रासाठीच तो धक्का होता,” असं अजित पवार म्हणाले आहेत. ते रविवारी विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या स्वागतपर भाषणात बोलत होते.

“गिरीश महाजन यांचं तर अजूनही रडणं बंद होईना. त्यांना फेटा बांधायला दिला तर त्यांनी फेटा सोडून डोळ्याला आलेलं पाणी पुसण्यासाठी फेट्याचा वापर करत आहेत. त्यांना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री न झाल्याचं फारच वाईट वाटलं, असं म्हणत अजित पवार यांनी गिरीश महाजन यांनाही खोपरखळी लगावली आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

‘…याचं भान सर्व राजकीय नेत्यांनी बाळगायला हवं’; अमित ठाकरेंची शिंदे सरकारवर टीका

अमित शहांनी मला दिलेलं वचन मोडलं, अन्यथा…; उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा

शिंदे-फडणवीस सरकार किती दिवस टिकणार?; जयंत पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले…