सांगली : बैलगाडी शर्यतीवरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून 20 ऑगस्टला सांगली जिल्ह्यातील झरे गावात पडळकर मोठी बैलगाडा शर्यत आयोजित केली आहे. तर स्थानिक प्रशासनाकडून कुठल्याही स्थितीत बैलगाडा शर्यत होणार नाही, असा पवित्रा घेतला आहे. तसेच झरे गावात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यावर रयत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया दिली.
आमदार गोपीचंद पडळकर यांना अटक करुनच दाखवा, आमच्यात काय हिंमत आहे ते तुम्हाला दाखवू, असा इशारा सदाभाऊ खोत यांनी सरकारला यावेळी दिला. बैलगाडा शर्यतीच्या मुद्द्यावर सरकारला शांततेत उत्तर देता आलं असतं., असं सदाभाऊ खोत म्हणाले.
घोड्याच्या शर्यती चालतात. मग बैलगाडीची शर्यती का चालत नाहीत? असं सत्तेत येण्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणत होते. त्याचं आता काय झालं? आता काय अस्वलाच्या शर्यती सुरु आहेत का?असा खोचक सवालही सदाभाऊ खोतांनी यावेळी केला.
दि. २० ऑगस्ट २०२१ रोजी होणाऱ्या भव्य “छकडा गाडी” शर्यतीसाठी झरे या गावांमध्ये पोहोचलो असता आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून माझा स्वागत करण्यात आले.
यावेळी तिथे बैलगाडा मालक व शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. @GopichandP_MLC @BJP4Maharashtra pic.twitter.com/uWRMdCjuNo
— Sadabhau Khot (@Sadabhau_khot) August 19, 2021
महत्वाच्या घडामोडी –
‘आधी केलेले पाप धुवा, मगच आशीर्वाद मागा’; जन आशीर्वाद यात्रेवरुन राष्ट्रवादीची टीका
“मुख्यमंत्री हे संकट मोचन, अनेक संकटे येऊनही ते उत्कृष्ट काम करत आहेत”