मुंबई : बांगलादेशी नागरिकांना बेकायदेशीररित्या भारताचं नागरिकत्व मिळवून देणाऱ्या टोळीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून राज्यातील एमआयएमच्या मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खलील आणि शेख आसिफ शेख रशीद या 2 आमदारांची स्वाक्षरी असलेले लेटरहेड्स जप्त करण्यात आली आहेत. यासंदर्भात भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत एक महत्त्वाची मागणी केली आहे.
धक्कादायक… बांग्लादेशींना नागरिकत्व मिळून देण्यासाठी वापरले MIM च्या आमदारांचे लेटर हेड… देशाच्या सार्वभौमत्व व सुरक्षेशी अत्यंत धोकादायक खेळ करणाऱ्या देश विघातक षड्यंत्राची कसून करा, देशद्रोह्यांना अटक करा…, असं ट्विट करत अतुल भातखळकर यांनी MIM च्या मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खलील आणि शेख आसिफ शेख रशीद या 2 आमदारांना अटक करण्याची मागणी केली आहे.
धक्कादायक…
बांग्लादेशींना नागरिकत्व मिळून देण्यासाठी वापरले MIM च्या आमदारांचे लेटर हेड…
देशाच्या सार्वभौमत्व व सुरक्षेशी अत्यंत धोकादायक खेळ करणाऱ्या देश विघातक षड्यंत्राची कसून करा, देशद्रोह्यांना अटक करा… pic.twitter.com/puYj74K4sR— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) November 2, 2020
महत्वाच्या घडामोडी-
पुण्यातील युवासेनेच्या उपनेत्याने मनसेचा झेंडा खांद्यावर घेतला; राज ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोनामुक्त; सुप्रिया सुळेंनी दिली माहिती
…पण हे सरकार अहंकारानं भरलेलं आहे; मंदिरं खुली करण्यावरून प्रविण दरेकरांची ठाकरे सरकारवर टीका
“लोणावळामध्ये ढाक भैरव येथील 200 फूट दरीत कोसळून पिंपरी चिंचवडमधील युवकाचा मृत्यू”