Home महाराष्ट्र केंद्र सरकारशी समनव्य साधून पायी जाण्याऱ्यांना रेल्वेने प्रवास करता येईल अशी व्यवस्था...

केंद्र सरकारशी समनव्य साधून पायी जाण्याऱ्यांना रेल्वेने प्रवास करता येईल अशी व्यवस्था करा- देवेंद्र फडणवीस

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोजगारासाठी परराज्यातून येऊन महाराष्ट्राच्या विविध भागात वसलेल्या मजूरांपैकी काही मजूर आपापल्या गावी पायी निघाले आहेत, यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे.

केंद्र सरकार रेल्वे देण्यास तयार आहे. त्यामुळे पायी जाण्यापासून तत्काळ रोखावं आणि  केंद्र सरकारशी समनव्य साधून त्यांना रेल्वेने प्रवास करता येईल अशी व्यवस्था करावी, अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल यांच्याशी चर्चा केली असून 10 रेल्वेगाड्या मुंबईतून उत्तर प्रदेशला जाणार असल्याचं सांगितलं आहे.

दरम्यान, सर्व कामगार बांधवांनी स्वतःची नोंदणी करून शासकीय व्यवस्थेतून प्रवास करावा. कृपया पायी चालत जाऊ नये, अशी विनंतीही देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

राज्य शासनानं स्थलांतरित मजुरांना आपल्या गावी परतवण्याची व्यवस्था करावी- चंद्रकांत पाटील

…म्हणून प्रवीण परदेशींना बळीचा बकरा बनवण्यात आलं; किरीट सोमय्याचं ठाकरे सरकरावर टिकास्त्र

…म्हणून अंत्यविधीला 20 जणांना तर दारुच्या दुकानासमोर हजारोंना परवानगी- संजय राऊत

कोणत्याही लसीशिवाया निघून करोना व्हायरस; डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य