दिपीका पादुकोणची ‘सवत’; याबाबत अर्जुन सिंग म्हणतो…

0
259

मुंबई : बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ते विवाहबंधनात अडकले होते. यावर रणवीर सिंगबद्दल अभिनेता अर्जुन कपूरने एका मुलाखतीत दीपिकाच्या सवतीबद्दलचा खुलासा केला आहे.

रणवीर माझी गाणी ऐकल्यानंतर मोठमोठे व्हॉइस मेसेज पाठवतो. अनेकदा माझ्या गालांवर किस करतो, असं म्हणत अर्जुन कपूरने एक मुलाखतीत रणवीर सिंगसोबतच्या त्याच्या मैत्रीबद्दल सांगितलं आहे. मी दीपिकालासुद्धा सांगितलं आहे की मी तुझी सवत आहे. असं अर्जुन कपूर म्हणाला आहे.

रणवीर आणि माझ्या मैत्रीत कधीच स्टारडम आडवं आलं नाही. इतकंच काय रणवीर-दीपिकाच्या लग्नानंतरही आम्ही पहिल्यासारखेच आहोत असंही अर्जुन कपूर म्हणाला.

दरम्यान, अभिनेता अर्जुन कपूरचा पानीपत 6 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अर्जुनसोबत कृती सेननसुद्धा असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here