मुंबई : उत्तरप्रदेशातील हाथरस झालेल्या बलात्काराच्या घटनेवरून देशभरातून संताप होत आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी वसईमध्ये जमलेल्या काॅंग्रेस कार्यंकर्त्यांमध्ये मारामारी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. यावरून भाजप नेते राम कदम यांनी प्रतिक्रिया देत या मारामारी घटनेचा व्हिडिओ ट्विटवर शेअर केला आहे.
काँग्रेसच्या गटांमध्ये निषेध स्थळी संघर्ष सुरू झाला ज्याने त्यांचा खरा हेतू उघडकीस आणला. बलात्काराची कोणतीही घटना निंदनीय आहे पण वसईतील कॉंग्रेस कामगारांच्या या अंतर्गत भांडणांनी एक उचित प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांना हाथरसमधील पीडितांसाठी खरोखर प्रसिद्धीबद्दल जास्त चिंता आहे का? असं राम कदम यांनी ट्विट करत काॅंग्रेसवर निशाणा साधला आहे.
#Cong factions clash at protest site which exposes their true motive.Any incident of rape is condemnable but these internal fights of Cong workers in Vasai raises a pertinent question. Do they really feel for the victim in #Hathras or more concerned about publicity? @RahulGandhi pic.twitter.com/Dt591Dyab4
— Ram Kadam – राम कदम (@ramkadam) October 7, 2020
महत्वाच्या घडामोडी-
अशा मुली बाजरीच्या शेतात मृतावस्थेत सापडतात; ‘या’ भाजप नेत्याचं धक्कादायक वक्तव्य
हाथरस प्रकरणी नरेंद्र मोदी गप्प का?; योगी सरकारने काहीही दडवू नये- संजय राऊत
शेतकरी हितासाठी सर्वांनी एकत्र यावं- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
शरद पवारांना शिवसेना संपवायची आहे; भाजपच्या ‘या’ नेत्याचा दावा