Home महाराष्ट्र दारू पिऊन जीवे मारण्याच्या धमक्या देण्यातच बलात्काऱ्याच्या समर्थकांचा पुरूषार्थ उरला आहे का?-...

दारू पिऊन जीवे मारण्याच्या धमक्या देण्यातच बलात्काऱ्याच्या समर्थकांचा पुरूषार्थ उरला आहे का?- चित्रा वाघ

मुंबई : पूजा चव्हाण या तरुणीने 7 फेब्रुवारी रोजी पुण्यातील महंमदवाडी येथे आत्महत्या केली होती. याप्रकरणामध्ये शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय राठोड यांचं नाव समोर आलं. याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी हे प्रकरण लावून धरत थेट संजय राठोड यांच्यावर पूजाच्या आत्महत्येला जबाबदार असल्याचा आरोप केला होता.

अशातच चित्रा वाघ यांनी ट्विटद्वारे संजय राठोड यांच्या समर्थकांवर निशाणा साधला आहे.

दारू पिऊन मला अर्वाच्य अश्लील शिव्या जीवे मारण्याच्या धमक्या देण्यातच बलात्काऱ्याच्या समर्थकांचा पुरूषार्थ उरला आहे का?. असं चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

दरम्यान, मध्यंतरी या प्रकरणा संबंधित सोशल माध्यमांवर काही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या होत्या. या माहितीच्या आधारे भाजपने वनमंत्री संजय राठोड यांच्यावर थेट आरोप केल्यानंतर अखेर संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा दिला.

महत्वाच्या घडामोडी –

ठाकरे सरकारचे मंत्रीच बेशिस्त इतरांना काय शिस्त लावणार?; जळगाव प्रकरणावरू पंकजा मुंडेंची टीका

कोणी मुख्यमंत्री देता का मुख्यमंत्री; ‘नटसम्राट’वरुन नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

“RCB साठी खुशखबर! 14.25 करोडला खरेदी केलेल्या ‘या’ खेळाडूने ठोकल्या एका षटकात ‘तब्बल’ इतक्या रन्स”

कोरोना म्हणतोय मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन; मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला