Home महाराष्ट्र हिंदू काय रस्त्यावर पडले आहेत का? या राज्यात काय मोगलाई आहे का?-...

हिंदू काय रस्त्यावर पडले आहेत का? या राज्यात काय मोगलाई आहे का?- देवेंद्र फडणवीस

मुंबई : ‘हिंदू समाज पूर्णत: सडका बनलाय’, असं वक्तव्य शरजील उस्मानी याने केलं होतं. त्यावरुन विधान सभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस चांगलेच आक्रमक झाले आहेत.

शरजील उस्मानी नावाचा सडक्या डोक्याचा व्यक्ती हा पुण्यात येतो व एल्गार परिषदेत, हिंदुंना सडकं म्हणतो. आणि त्याच्यावर कुठलीही कारवाई होत नाही. हिंदू काय रस्त्यावर पडले आहेत का? या राज्यात काय मोगलाई आहे का? या सरकारला लाज वाटायला पाहिजे.” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

गृहमंत्री म्हणतात आम्ही चौकशी करू. कशाची चौकशी करता? सगळीकडे त्याचा स्पष्ट व्हिडिओ दिसतो आहे. तो व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होतो आहे. जर या महाराष्ट्रात कुणी येऊन हिंदुंना सडकं म्हणणार असेल आणि महाराष्ट्राचं सरकार ऐकून घेणार असेल, तर भाजपा गप्प बसणार नाही. तत्काळ त्याच्यावर गुन्हा दाखल करून, जर त्याला अटक केली नाही. तर, त्याविरोधात आम्ही आंदोलन सुरू करू, असा इशारा आम्ही सरकारला देतो आहोत, असंही फडणवीस म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

“जुने गेले तर नवे कार्यकर्ते उभारी घेतील, सगळ्यांनाच राज ठाकरे होता येत नाही”

“मनसेला धक्का! मनसेच्या ‘या’ मोठ्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश”

“ठाकरे ‘संपत्ती’ लपवण्यात, तर धनंजय मुंडे ‘संतती’ लपविण्यात व्यस्त”

“रायगडावरील तिकीटघराचा शिवभक्तांकडून कडेलोट”