Home महाराष्ट्र “72 तासांच्या आत माफी मागा अन्यथा…”; मंत्री अनिल परबांकडून सोमय्यांविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा

“72 तासांच्या आत माफी मागा अन्यथा…”; मंत्री अनिल परबांकडून सोमय्यांविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा

आमच्या सर्व बातम्या मिळवण्या साठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. यानंतर आता अनिल परब यांनी तब्बल 100 कोटी रुपयांच्या मानहानीचा दाव्याची नोटीस वकिलामार्फत किरीट सोमय्या यांना बजावली आहे.

या तथ्य नसलेल्या आरोपांमुळे सामान्य माणसांमध्ये माझी प्रतिमा मलिन होत असून कुटुंबाची विनाकारण बदनामी होत आहे. ही नोटीस मिळाल्यानंतर 72 तासाच्या आत माझ्या आरोपांबाबत केलेले सर्व ट्विट डिलिट करण्याचा आणि बिनशर्त माफी मागण्याचा इशारा या नोटिशीच्या माध्यमातून परब यांनी सोमय्यांना दिला आहे.

दरम्यान, यापुढे सोमय्या यांनी माझ्यावर असे आरोप करू नयेत, माझ्या संदर्भात केलेले भ्रष्टाचाराबाबतचे असलेले जुने ट्विट डिलीट करावे, माफीनामा मराठी, इंग्रजी किंवा हिंदी या भाषेतील किमान दोन वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित केला जावा, नोटीस मिळाल्याच्या 72 तासांत नोटिशीतील मागण्या पूर्ण न केल्यास न्यायालयात 100 कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला जाईल, असा इशारा परब यांच्या वकिल सुषमा सिंग यांनी दिला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

प्रवीण दरेकरांविरोधात राष्ट्रवादी आक्रमक; पुण्यात जोडे मारो आंदोलन

…तर मोदी सरकारही पाडलं जाऊ शकतं; अण्णा हजारेंचा इशारा

“…तर कंगनाविरोधात अटक वॉरंट काढू”

…तर मी राजीनामा द्यायला तयार आहे- विजय वडेट्टीवार