माफी मागा, अन्यथा…; सुरेखा पुणेकरांचा प्रविण दरेकरांना इशारा

0
672

आमच्या सर्व बातम्या मिळवण्या साठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे, असं वक्तव्य विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या एबीपी माझासोबत बोलत होत्या.

“राष्ट्रवादी काँग्रेस हा महिलांचा आदर करणारा पक्ष आहे. प्रवीण दरेकर फार चुकीचं बोलले. त्यांना महिलांचा आदर करता येत नसेल तर अवहेलना तरी करु नका. त्यांनी जाहीर माफी मागावी. अन्यथा त्यांना खूप त्रास होईल”, असं सुरेखा पुणेकर म्हणाल्या आहेत.

“सगळ्या पक्षांमध्ये लोककलावंत आहेत. माझा पक्षप्रवेश आहे म्हणून दरेकर असे का बोलले. दरेकरांच्या वक्तव्यामुळे लावणी क्षेत्रातील स्त्रियांना खूप वाईट वाटलं. माझ्यासारखी महिला एवढ्या कष्टाने जर घडत असेल. मात्र आज दरेकरांसारखे विरोधी पक्षनेते असे विधान करतात, हे चुकीचे आहे. भाजपा सारख्या पक्षात प्रवीण दरेकर सारखे नेत्यांचा काही उपयोग नाही.”,असंही सुरेखा पुणेकर यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“सांगलीतील महिला व्यावसायिकाला लुबाडलं, दुबईतील कंपनीकडून दीड कोटींची फसवणूक”

मुंबई पोलिसांना त्यांच्या मर्जीनुसार काम करू द्या, राजकारण करू नका- दिलीप वळसे पाटील

भाजपने किरीट सोमय्यांना ईडीचं प्रवक्तेपद द्यावं; रोहित पवारांचा टोला

सांगलीमध्ये खाजगी कार्यालयात लसीकरण न केलेला स्टाफ आढळून आल्यास कार्यालये सील करणार- नितीन कापडणीस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here