आमच्या सर्व बातम्या मिळवण्या साठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला उद्देशून मंचावर उपस्थित सर्व आजी-माजी आणि भावी सहकारी’ असा उल्लेख केल्यानंतर महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. यावर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेनेची भूमिका नेहमीच स्पष्ट राहिलेली आहे. शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी आज पक्षाची भूमिका स्पष्ट केली. ज्यांना कुणाला आमच्याबरोबर यायचं असेल त्यांनी यावं आणि भावी व्हावं. आजी सहकारी व्हावं. जे माजी आहेत ते आजी होतील. त्यामुळे तुम्ही त्याला भूकंप वगैरे म्हणू नका, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“राज ठाकरेंनी दिला आजोबा प्रबोधनकार ठाकरेंच्या आठवणींना उजाळा”
धनंजय मुंडेंच्या ‘त्या’ वकतव्याकडे मी निव्वळ विनोद म्हणून पाहते; प्रीतम मुंडेंचा टोला
“पुण्यात अजित पवारांनी भाजपची डोकेदुखी वाढवली?; अनेक नगरसेवक संपर्कात असल्याचा केला दावा”