खुर्चीत गांजा मारून कोणालाही बोलता येते, पण…; शिवसेनेचा किरीट सोमय्यांवर निशाणा

0
369

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढला आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा राज्य सरकारकडून काही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यावरून  भाजप नेते किरीट सोमय्या  यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. त्या टिकेला आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी यावरून सोमय्यांवर जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

हे ही वाचा : विद्या चव्हाण-अमृता फडणवीसांच्या वादावर देवेंद्र फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

‘घाबरण्यापेक्षा आपण काळजी घेऊया. घाबरवणे हे आमच्या रक्तात नाही आणि आम्हीसुद्धा घाबरत नाही. खुर्चीत गांजा मारून कोणालाही बोलता येते. पण परिस्थिती तपासून पाहताना आमच्या बाळासाहेबांनी आम्हाला धाडस दिलं आहे. उद्याच्या मृत्यूला मी घाबरत नाही. त्यामुळे तेवढं धाडस आपण दाखवावे,’ असम किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, काही सत्ताधारी नेते स्वत:चं राजकीय वजन वाढविण्यासाठी, आर्थिक कमाईसाठी कोरोनाची तिसरी लाट, प्रचंड वाढ, लॉकडाऊन अशा धमक्या देऊन लोकांमध्ये भीती निर्माण करत आहेत,’ असं वक्तव्य किरीट सोमय्या यांनी केलं होतं.

महत्वाच्या घडामोडी – 

“केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना कोरोनाची लागण, ट्विट करत दिली माहिती”

“खासदार संजय राऊत यांच्या संपर्कात माजी आमदार, लवकरच शिवबंधन हाती बांधणार”

भाजप नेते आशिष शेलारांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here