आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याची मोहोर उमटली तिथे तिथे हर हर महादेवची गर्जना संपूर्ण महाराष्ट्रभर पसरली. तसेच या गर्जनेशिवाय मराठ्यांचा इतिहास पूर्णच होऊ शकत नाही. अशातच आता झी स्टुडिओजच्या ‘हर हर महादेव’या चित्रपटातून हीच ऊर्जा आता परत एकदा अनुभवायला मिळणार आहे.
अभिजित देशपांडे लिखित- दिग्दर्शित झी स्टुडिओ आणि गणेश मार्केटिंग फिल्म्स निर्मित ‘हर हर महादेव’ हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा युट्यूबवर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
हे ही वाचा : “शिवसेनेचा मनसेला मोठा धक्का, नागपुरमधील अनेक पदाधिकाऱ्यांनी हाती बांधलं शिवबंधन”
दरम्यान, नुकतंच महाराष्ट्र सरकारनं काही निवडक शहरांमध्ये चित्रपटगृहे पूर्ण क्षमतेने सुरू होणार असल्याची महत्त्वाची घोषणा केली. याच पार्श्वभूमीवर प्रेक्षकांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ‘हर हर महादेव’ या चित्रपटाचा टीझर झी स्टूडियोजने प्रेक्षकांच्या भेटीस आणला आहे. तसेच ‘हर हर महादेव’ ही गर्जना राज ठाकरेंच्या आवाजात ऐकायला मिळणार आहे.
महत्वाच्या घडामोडी –
अन् गिरीश महाजनांनी दाऊदच्या नातेवाईकांसोबत जेवण केलं होतं; एकनाथ खडसेंचा मोठा गाैफ्यस्फोट
“शिवसेनेचा काँग्रेस, भाजपला मोठा धक्का, संभाजीनगरमधील अनेक पदाधिकाऱ्यांनी हाती बांधलं शिवबंधन”