“संजय राठोडांच्या विरोधात आणखी एका महिलेची पोलिसात तक्रार; चित्रा वाघ यांनी दिली माहिती

0
352

मुंबई : शिवसेना नेते संजय राठोड यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. संजय राठोड यांच्याविरोधात आणखी एका महिलेने तक्रार केली आहे.

यवतमाळ पोलिसांकडे याबाबतची तक्रार पोस्टाने करण्यात आली आहे. संजय राठोड यांनी माझ्याकडे शरीरसुखाची मागणी केली आहे, अशी लिखित तक्रार या महिलेने केली आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

शिवसेना आमदार आणि माजी मंत्री संजय राठोड यांच्यावर शरीरसुखाची मागणी केल्याची लिखित सविस्तर तक्रार एका भगिनीने यवतमाळ पोलिसांना पोस्टाने पाठवली आहे. त्यावेळी मंत्री असल्यामुळे तक्रारीची दखल घेतली गेली नाही. तसेच आजही संजय राठोड माझ्याकडे शरीरसुखाची मागणी करत लैंगिक छळ करतो, असं त्यात म्हटले आहे. यासोबत चित्रा वाघ यांनी या तक्रारीच्या पत्राचे दोन फोटोही पोस्ट केले आहे.

महत्वाच्या घडामोडी –

चंद्रकांत पाटील यांना आता मराठा आरक्षणावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही- अशोक चव्हाण

घोषणाबहाद्दर विजय वडेट्टीवारांनी राजीनामा द्यावा; आमदार गोपीचंद पडळकर यांची मागणी

हॅलो मी शरद पवार बोलतोय! शरद पवारांचा हुबेहूब आवाज काढून मंत्रालयात फोन

शाळेबद्दल एक ठोस निर्णय सरकारने दिला पाहिजे- देवेंद्र फडणवीस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here