दिल्ली कॅपिटल्सचा आणखी एक विजय; राजस्थानवर 13 धावांनी मात

0
182

दुबई : आजच्या आयपीएलच्या दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध राजस्थान राॅयल्स यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने राजस्थानचा 13 धावांनी पराभव केला.

दिल्ली कॅपि़टल्सने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी गमावत 161 धावा केल्या. दिल्लीकडून शिखर धवनने 33 चेंडूत 57 धावा, श्रेयस अय्यरने 43 चेंडूत 53 धावा केल्या. तर राजस्थानकडून जोफ्रा आर्चरने 3, जयदेव उनादकडने 2 तर कार्तिक त्यागी व श्रेयस गोपालने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

धावांचा पाठलाग करताना राजस्थानने 20 षटकात 8 गडी गमावत 148 धावाच करू शकल्या. राजस्थानकडून बेन स्टोक्सने 35 चेंडूत 41 धाला, राॅबिन उथप्पाने 27 चेंडूत 32 धावा, संजू सॅमसनने 18 चेंडूत 25 धावा, तर जाॅस बटलरने 9 चेंडूत 22 धावा केल्या. तर दिल्लीकडून तुषार देशपांडे, नाॅर्त्झेने 2, तर रबाडा, अश्विन व अक्षर पटेलने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

महत्वाच्या घडामोडी-

शिखर धवन व श्रेयस अय्यरची शानदार अर्धशतके; दिल्लीचे राजस्थानसमोर 162 धावांचे लक्ष्य

दिल्लीत सहा वर्षांपासून कोणाचा बाप बसलाय; चंद्रकांत पाटलांचा राष्ट्रवादीला पलटवार

दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकला; प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

तुमच्या बापाला बाप म्हणायला वारसदार तरी आहेत का?; राष्ट्रवादीचा चंद्रकांत पाटलांना सवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here