आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या हे सातत्याने महाविकास आघाडीतील नेत्यांवर आरोप करताना दिसत आहेत. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्या, कारखाने आणि लोकांवर आयकर विभागानं गेल्या 4 दिवसांपासून छापेमारी सुरु आहे. यावरून किरीट सोमय्यांंनी अजित पवारांना पुढील इशारा दिला आहे.
अजित पवार आणि त्यांच्या निकटवर्तियांची बुधवारी आणखी एक पोलखोल करणार आहे, असा इशारा किरीट सोमय्यांनी यावेळी दिला. तसेच यावेळी बोलताना सोमय्यांनी, जरंडेश्वर कारखान्याचा मालक कोण आहे? तसेच किती हजारांचे घोटाळे केले? जरंडेश्वर कारखान्याचा मालक कोण आहे? तसेच किती हजारांचे घोटाळे केले? असे अनेक सवाल सोमय्यांनी यावेळी उपस्थित केले.
दरम्यान, जोपर्यंत या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत तोपर्यंत पवारांना प्रश्न विचारत राहणार. तसेच आशा करतो की, या प्रश्नांची उत्तरे देण्याची त्यांच्यात हिंमत असावी, असा टोलाही सोमय्यांनी यावेळी लगावला.
महत्वाच्या घडामोडी –
काँग्रेसचा ‘हा’ बडा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर; चर्चांना उधाण
“अजित पवारांनी रडणं बंद करावं, त्यांचे बाहेर राहण्याचे जास्त दिवस शिल्लक नाहीत”
बंद पुकारने ही महाविकास आघाडीची चुकीची भूमिका- रामदास आठवेले
राणें कुटूंबियांकडून शिवसेनेला मोठा धक्का; सिंधुदुर्गमध्ये 3 नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश