नांदेड : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आधी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणूक स्वबळावरच लढणार असल्याची घोषणा केली होती. आता महाविकास आघाडीतील आणखी एका पक्षाने स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याची घोषणा केली आहे.
स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याची घोषणा राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या ‘प्रहार संघटने’ने केली आहे. नांदेडमध्ये पक्षाच्या झालेल्या बैठकीत या संदर्भात निर्णय घेण्यात आला. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम व नागपूर या 5 जिल्हा परिषद, तसंच त्या अंतर्गत येणाऱ्या 33 पंचायत समित्यांमधील रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे.
दरम्यान, 5 जिल्हा परिषद आणि 33 पंचायत समित्यांमधील निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. 19 जुलै रोजी मतदान होणार असून 20 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“आपणच बॉस असून पवारांना फाट्यावर मारतो, हे मुख्यमंत्र्यांनी दाखवून दिलं”
14 दिवसाचं अधिवेशन झालं तर…; सुधीर मुनगंटीवारांची ठाकरे सरकारवर टीका
सरकार पावसाळी अधिवेशनापासून पळ काढतंय- प्रवीण दरेकर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा परदेशात काळा पैसा, ईडीला पुरावे देणार; आमदार रवी राणांचा आरोप