“ठाकरे सरकारमधील आणखी एक मंत्री किरीट सोमय्यांच्या रडारवर; ट्विट करत दिली माहिती”

0
367

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या हे सातत्याने महाविकास आघाडीतील नेत्यांवर आरोप करताना दिसत आहेत. अशातच आता सोमय्यांनी महाविकास आघाडीतील आणखी एका नेत्यावर आरोप केले आहेत.

हे ही वाचा : “खासदार संजय राऊत यांनी घेतली काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची भेट, तर्कवितर्कांना उधाण”

किरीट सोमय्या यांनी ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केलेल्या घोटाळ्या संदर्भात माहिती दिली आहे.

राम गणेश गडकरी साखर कारखाना प्राजक्त तनपुरेंच्या नावाने ट्रान्सफर करण्यात आला. 100 कोटीची संपत्ती 13 कोटीत दिली गेली. तीच संपत्ती तनपुरे यांनी अनिल देशमुख यांना पास ऑन केली. प्राजक्त तनपुरे हे अनिल देशमुखांच्या वाटेवर असून त्यांच्यावरही कारवाई होणार असल्याचं किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. तसेच शरद पवारांच्या आशीर्वादानं अनिल देशमुख यांनी बेनामी पद्धतीने प्राजक्त तनपुरे यांच्याद्वारे रामगणेश गडकरी साखर कारखाना काबीज केला. त्याचे पुरावे बाहेर आले आहेत, त्यांच्या अडचणी वाढणार असल्याचंही सोमय्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

गरम असलेल्या शशिकांत शिंदेंना थंड करुन घरी बसवणार; शिवेंद्रराजे भडकले

शिवसेनेकडून भाजपला मोठा धक्का; वर्ध्यातील भाजप पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

मोदी सरकारने ओबीसी बांधवांच्या पाठीत खंजीर खुपसला; राष्ट्रवादीचा आरोप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here