आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह बंड करत शिवसेनेत मोठी फूट पाडली. आणि शिंदेंनी भाजपसह सरकार स्थापन केलं. त्यानंतर शिवसेनेत गळती सूरू झाली. अशातच आता शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सेवेकरी म्हणून ओळखले जाणारे चम्पासिंग थापा यांनी आज उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान, बाळासाहेब यांच्या निधनानंतर थापा यांनी मातोश्रीसोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केलं होते. मात्र, आज अचनाक त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यातील टेंभीनाका येथील देवीच्या मिरवणुकीदरम्यान भेट घेऊन त्यांना पाठींबा दिला.
महत्त्वाच्या घडामोडी –
मराठा आरक्षणाबाबत विरोधकांवर बोलताना शिंदे गटातील मंत्री तानाजी सावंत यांची जीभ घसरली, म्हणाले…
“पाकिस्तान जिंदाबादच्या विरोधात पुण्यात मनसेचं खळखट्याक आंदोलन, पाकिस्तानचा झेंडा जाळला”
उद्धव ठाकरेंचा भाजपाला धक्का; भाजपच्या ‘या’ नेत्याचा शिवसेनेत प्रवेश