ठाकरे गटाला आणखी एक झटका; ‘या’ मोठ्या नेत्याचा शिंदे गटात प्रवेश

0
355

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटाला मोठा झटका दिला आहे. संजय राऊतांचे नाशिकचे शिलेदार आणि संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी हे काही वेळातच शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. मात्र त्यांच्या पक्ष प्रवेशापूर्वीच उद्धव ठाकरेंनी त्यांची आपल्या पक्षातून हकालपट्टी केली आहे. याबाबतची माहिती संजय राऊत यांनी ट्विट करून दिली.

हे ही वाचा : …तर आधी राजीनामा द्या, मग…; राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिली तंबी

नाशिकमध्ये भाऊसाहेब चौधरी हे कट्टर शिवसैनिक ओळखले जातात. गेल्या काही वर्षांपासून नाशिक शिवसेनेचे संपर्कप्रमुख म्हणून काम करत होते. चौधरी हे संजय राऊत यांचे शिलेदार म्हणूनही ओळखले जायचे. त्यामुळेच भाऊसाहेब चौधरी यांची गच्छंती हा संजय राऊत यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातो.

दरम्यान, भाऊसाहेब चौधरी आज रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, आणि आमदार सुहास कांदे यांच्या उपस्थितीत ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षात प्रवेश करणार आहेत.

महत्त्वाच्या घडामोडी –

“धक्कादायक! औक्षण करत असताना उडाला भडका, सांगलीत नवनिर्वाचित सरपंच थेट रूग्णालयात,”

चंद्रपूरमध्ये मनसेचा भगवा फडकला, दाताला ग्रामपंचायतीवर मनसेचं वर्चस्व

अमोल कोल्हेंनी घेतली रावसाहेब दानवे यांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here