पश्चिम बंगालमध्ये भाजपला दुसरा धक्का

0
172

पश्चिम बंगाल : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 105 जागा मिळून देखील भाजपला सत्तास्थापन करता आली नाही. या धक्क्यातून भाजप सावरलेलं नसताना पश्चिम बंगालमध्ये भाजपला दुसरा धक्का बसला आहे.

पश्चिम बंगालमधील विधानसभेच्या 3 जागांवर झालेल्या पोटनिवडणुकांत तृणमुल काँग्रेसने भाजपचा दणदणीत पराभव केला आहे. भाजपची अहंकारी वृत्ती आणि भाजपने धरलेला एनआरसीचा आग्रह या विरोधात जनतेने दिलेला हा कौल आहे, अशी प्रतिक्रिया पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केली आहे.

खरगपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत तृणमुल काँग्रेसचे उमेदवार प्रदीप सरकार यांनी भाजपच्या प्रेमचंद झा यांचा पराभव केला. कालियागंज मतदारसंघातून तृणमुल काँग्रेसचे उमेदवार तपन देब सिन्हा यांनी भाजपचे उमेदवार कमलचंद्र सरकार पराभव केला. तर करीमपूरमधून तृणमुलच्या सिन्हा रॉय यांनी भाजपच्या मजुमदार यांचा पराभव केला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रापाठोपाठ आता गोव्यातही राजकीय भूकंप होणार. भाजपचा आता परतीचा प्रवास सुरू झालाय, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here