Home महाराष्ट्र अनिल परब यांनी राजीनामा द्यावा, चाैकशीसाठी सामोरं जावं- नितेश राणे

अनिल परब यांनी राजीनामा द्यावा, चाैकशीसाठी सामोरं जावं- नितेश राणे

मुंबई : परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर 300 कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप करण्यात आला आहे. यावर भाजप नेते नितेश राणे यांनी प्रतिक्रिया देत अनिल परब यांच्यावर टीका केली आहे. नितेश राणेंनी टी.व्ही.9 मराठीशी संवाद साधला. त्यात ते बोलत होते.

आता चाैकशी समिती बसली आहे, ती राज्य सरकारचीच आहे. आणि हे राज्य सरकारचे कॅबिनेट मंत्री आहेत. आता ती चाैकशी किती पारदर्शक होईल, याच्यावर अजून काही स्पष्टता नाही. म्हणून माझं असं म्हणणं आहे की, ही चाैकशी खरंच पारदर्शक झाली पाहिजे. खऱ्या अर्थाने त्या झालेल्या आरोपाची चाैकशी झाली पाहिजे. कारण याच अनिल परबांचं नाव हे वाझे प्रकरणात पण ठळक पद्धतीने येतंय, त्याही पत्रामध्ये यांचं नाव होतं. म्हणून त्या सगळ्याची चाैकशी ही योग्य पद्धतीने सीबीआय करू शकतात. याचं कारण असं आहे की, जे काही चाैकशी खोलात जाऊन करायची असेल, ते सरकारच्या मंत्री पदावर असताना चाैकशी कशी होऊ शकते, हे मला कळले नाही., असं नितेश राणेंनी म्हटलं.

जेंव्हा अशोक चव्हाणांवर आरोप झाले तेंव्हा त्यांनी राजीनामा दिला, आणि मग चाैकशीच्या समोरे गेले, अजितदादांवर आरोप झाले सिंचनाचे, त्यांनी राजीनामा दिला आणि मग चाैकशीच्या समोरे गेले, संजय राठोड यांच्यावर आरोप झाले तेंव्हा त्यांनी राजीनामा दिला, आणि मग त्याची आता चाैकशी सुरू आहे, अनिल देशमुखांची पण तीच परिस्थिती आहे, त्यांनी राजीनामा दिला, आणि मग त्याची आता चाैकशी सुरू आहे. मग यांना का वेगळं? हा काय सरकारचा जावई आहे हा अनिल परब? असा प्रश्न नितेश राणेंनी केला. आणि म्हणून अनिल परब यांची चाैकशी करायची असेल, तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, आणि त्यांची सीबीआय चाैकशी झाली पाहिजे, असं नितेश राणे म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

चंद्रकांतदादांना काय बोलावं हे कळत नाही, त्यांना मस्ती आली आहे; हसन मुश्रीफांचा हल्लाबोल

‘या’ सरकारच्या बेफिकीरीमुळेच ओबीसींचं आरक्षण गेलं- चंद्रशेखर बावनकुळे

औरंगजेबाला स्वप्नात शिवाजी महाराज दिसायचे, त्याचप्रमाणे चंद्रकांतदादांना अजित पवार दिसतात- अमोल मिटकरी

देशातील गरीबांनी मरावं आणि श्रीमंतांनी जगावं हीच मोदी सरकारची इच्छा- नाना पटोले