मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख हे 15 फेब्रुवारी रोजी होम आयसोलेशनमध्ये होते असं म्हणता तर मग त्यांनी पत्रकार परिषद कशी घेतली? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. याला अनिल देशमुख यांनी प्रत्युत्तर दिलंय.
अनिल देशमुख यांनी एका व्हिडीओद्वारे ही मागणी केली आहे. मी नागपूरच्या रुग्णालयात 5 ते 15 फेब्रुवारी दरम्यान अॅडमिट होतो. मला कोरोना झाला होता. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर घरी जात असताना मला काही पत्रकार भेटले. त्यांनी मला सेलिब्रिटजवरील वादावर काही प्रश्न केले. तेव्हा माझ्या अंगात ताप नव्हता. पण अंगात त्राण होता. मला थकवा आलेला होता. त्यामुळे रुग्णालयाच्या गेटवरच पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली, असं अनिल देशमुख यांनी सांगितलं.
दरम्यान, त्यानंतर मी थेट गाडीत बसून घरी गेलो आणि होम आयसोलेशनमध्ये गेलो. त्यानंतर 28 फेब्रुवारीला मी सह्याद्री गेस्ट हाऊसला पहिल्यांदा आलो, असं देशमुख यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
खंडणी मागण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा हात; नवनीत राणांचा आरोप
‘या’ कारणामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल”
देवेंद्र फडणवीसांच मानसिक संतुलन बिघडलंय; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचा फडणवीसांवर हल्लाबोल
देशमुख क्वारंटाईनमध्ये होते, तर…; देवेंद्र फडणवीसांचा पवारांना सवाल