पुणे : कर्वेनगर आणि वारजे भागातील प्रवासी नागरिकांच्या सोयीसाठी शिवसेना शिंदे गटाच्या युवा सेनेचे महाराष्ट्राचे समन्वयक अनिकेत जावळकर यांनी पीएमपीएमएलकडे एक मोठी मागणी केली आहे. या मागणीमुळे प्रवासी नागरिकांना दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर पीएमपीएमएलच्या प्रवाशांमध्ये देखील वाढ होण्यास मदत होणार आहे.
अनिकेत जावळकर यांनी पीएमपीएमएलचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर यांची भेट घेतली. वारजे जुना जकात नाका अर्थात गालिंदे पथ येथे पीएमपीएमएलचे बस पास केंद्र सुरु करण्याची मागणी जावळकर यांनी केली आहे. कर्वेनगर भागात मोठ्या शैक्षणिक संस्था आहेत, कर्वेनगर पासून वारजे पर्यंत होस्टेल्स मोठ्या प्रमाणात आहेत. प्रवाशांची संख्या देखील मोठी आहे. म्हणून वारजे जुन्या जकात नाक्यावर बस पास केंद्र पूर्ववत सुरु केल्यास, प्रवाशांना दिलासा मिळेल. या पार्श्वभूमीवर गालिंदे पथ बस थांब्यावर पास केंद्र सुरु करण्याची मागणी जावळकर यांनी केली आहे.
