अन् गिरीश महाजनांनी दाऊदच्या नातेवाईकांसोबत जेवण केलं होतं; एकनाथ खडसेंचा मोठा गाैफ्यस्फोट

0
318

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

जळगाव : कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या बहिणीशी जमिनीचा व्यवहार केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे  नेते व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. यावरून महाविकास आघाडी व भाजप नेत्यांमध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अशातच आता या प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भाजपलाही दाऊद इब्राहिमचा सहकारी इकबाल मिर्चीकडून देणगी मिळाली होती व भाजप आमदार गिरीश महाजनांनीही नाशिक येथे दाउदच्या नातेवाईकांसोबत जेवणही केले होते, असा मोठा गौप्यस्फोट एकनाथ खडसेंनी यावेळी केला. ते जळगावमध्ये माध्यमांशी बोलत होते.

हे ही वाचा : “राष्ट्रवादीचा मोठा डाव; राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केलेले ‘हे’ 2 मोठे नेते पुन्हा राष्ट्रवादीत गृहप्रवेश करणार”

दरम्यान, दाऊदशी किंवा दाऊदच्या बहिणीशी जमिनीचा व्यवहार केला म्हणून मलीक यांना अटक करण्यात आली याबाबत सर्वानाच माहिती आहे. त्यांच्यावर राजकीय हेतूने आरोप करण्यात आलेत असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र अद्याप ते सिद्ध झालेले नाही. एका बाजूला दाऊदशी संबध जोडत असतांना भाजपलाही इकबाल मिर्चीकडून देणगी मिळालेली आहे. हा मिर्ची कोण आहे तर, तो दहशतवादी संघटनेचा प्रमुख आहे. गिरीश महाजनांनी नाशिक येथे दाऊदच्या नातेवाईकांसोबत भोजन केले होते. म्हणून काय त्यांचे दाऊतच्या नातेवाईकांसोबत संबध आहेत असे म्हणता येईल का? आणि जर तसे असेल तर भाजपने याबाबत खुलासा केला पाहिजे, असा सवाल एकनाथ खडसेंनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

“शिवसेनेचा काँग्रेस, भाजपला मोठा धक्का, संभाजीनगरमधील अनेक पदाधिकाऱ्यांनी हाती बांधलं शिवबंधन”

‘असा राज्यपाल लाभणं हे महाराष्ट्राचं दुर्दैव’; सावित्रिबाईंबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन काँग्रेसची टीका

“सांगलीत राष्ट्रवादीकडून भाजपचा करेक्ट कार्यक्रम, ‘हा’ मोठा नेता हाती बांधणार घड्याळ”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here