धक्कादायक!”…अन् त्याच्यावर आईचा मृतदेह बाईकवरुन स्मशानात नेण्याची वेळ”

0
146

शववाहिका न मिळाल्याने कुटुंबीयांनी मोटारसायकलवरून मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेल्याची धक्कादायक घटना आंध्र प्रदेशात घडली.

आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यात मांडासा गावात ही घटना घडली आहे. मांडासा या गावात 50 वर्षिय महिला मरण पावली होती. या महिलेचा मृतदेह नेण्यासाठी कुटुंबीयांनी रुग्णवाहिका किंवा अन्य वाहनांसाठी बरेच प्रयत्न केले. खूप वेळ वाट पाहूनही वाहन आथवा रुग्णवाहिका  मिळत नसल्याने कुटुंबीयांनी मृतदेह मोटार सायकलवरुन नेण्याचा निर्णय घेतला. या महिलेचा मुलगा आणि जावायाने मोटारसायकलवरुन मृतदेह गावत अत्यसंस्कार करण्यासाठी नेला.

दरम्यान, या महिलेला कोरोनाची लक्षणे होती  तिची कोरोना चाचणी झाली होती. मात्र रिपोर्ट येईपर्यंत त्यांची तब्बेत खालावली. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आलं. मात्र तेथे त्यांची प्रणज्योत मावळली.

महत्वाच्या घडामोडी –

धोनी ब्रिगेडची विजयी घोडदौड; चेन्नईचा हैदराबादवर 7 विकेट्सने विजय

“गिरीश भाऊंना राजकारणात मी आणलं, म्हणून आज गिरीश भाऊ दिसत आहेत”

“राज्यात 15 मे पर्यंत लाॅकडाऊन वाढवला”

मुंब्र्यातील रुग्णालयात आग! या दुर्घटना रोखण्यासाठी महावसुली आघाडी सरकारला वेळ नाही; भातखळकरांची टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here