“…आणि धनंजय मुंडेंनी सरकारी अधिकाऱ्याला भर बैठकीतून हाकललं”

0
697

बीड : पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतून नगरपालिकेचे मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे यांना हाकलवून दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

उत्कर्ष गुट्टे यांना अहवाल मागवून देखील सादर केला नाही. त्यामुळे संतापलेल्या धनंजय मुंडे आणि नियोजन समितीवरील सदस्यांचा पारा चढला. येथे कोणाचीही गय केली जाणार नसल्याचे खडे बोल सुनावत धनंजय मुंडे यांनी गुट्टे यांना भर बैठकीतून हाकलून दिले.

दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी सदर अधिकाऱ्यावर तातडीने निलंबन करण्याबाबत संबंधित यंत्रणेला सूचित केले आहे. या सर्व प्रकारामुळे बीड जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची पाचावर धारण बसली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

शेतकऱ्यांना न्याय दिला तर बिघडलं काय?; छगन भुगबळांचा सवाल

कोरोनानंतर नाईट लाईफ पुन्हा सुरू करणार- आदित्य ठाकरे

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर सुधीर मुनगंटीवारांचं वक्तव्य; म्हणाले…

संजय राऊतांना महाराष्ट्राच्या नावाने राजकारण करायला पाहिजे; निलेश राणेंची टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here