आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात मनसे-भाजप युतीच्या चर्चा जोरदार रंगत आहे. अशातच आता मनसे नेत्याचं आणि भाजप नेत्याचं काॅल रेकाॅर्डिंग व्हायरल झाल्याचं पहायला मिळत आहे.
भाजपचा पुणे शहराध्यक्ष फोन उचलेना म्हणून भाजपचे छत्तीसगडचे प्रदेश कोशाध्यक्ष सचिन मेघाणी यांनी मदतीसाठी पुण्याचे मनसेचे डॅशिंग नेते यांना फोन लावल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
हे ही वाचा : “उपमुख्यमंत्री अजित पवार-आदित्य ठाकरेंचा एकत्र प्रवास, नेमकी काय चर्चा?; चर्चांना उधाण”
सचिन मेघाणी यांनी आपल्या बहिणीच्या कामासाठी मनसे नेते वसंत मोरे यांना थेट फोन लावला. भाजपचे पुण्याचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक हे फोन उचलत नाहीत म्हणून तुम्हांला फोन लावल्याचं सचिन मेघाणी यांनी यावेळी सांगितलं. यावर मोरेे यांनी, पुण्यात भाजपचे एवढे कार्यकर्ते असून तुम्ही मला फोन केला म्हणजे, तुम्हांलाही माहिती आहे की, मनसेच काम करू शकते. ज्यांचं काम आहे, त्यांना माझ्या ऑफीसला पाठवून द्या, मी काम करून देतो, असं आश्वासन वसंत मोरेे यांनी यावेळी सचिन मेघाणी यांना दिलं.
महत्वाच्या घडामोडी –
“जळगावमध्ये शिवसेनेचा गिरीश महाजनांना दणका; ‘या’ 4 नगरसेवकांनी हाती बांधलं शिवबंधन”