महाराष्ट्राला धक्का देणारी घटना एका रात्रीत घडली; अजित पवारांना सोबत घेऊन भाजपचं सरकार

0
140

मुंबई : महाराष्ट्राला नव्हे तर देशाला धक्का देणारी घटना एका रात्रीत घडली आहे. अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत थेट भाजपबरोबरच्या सरकारमध्ये सामील झाले.

शुक्रवारी संध्याकाळी महाविकास आघाडीचं पर्यायी सरकार देण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची बैठक पार पडली आणि त्यात सकारात्मक चर्चा झाल्याचं सांगण्यात आलं. या बैठकीला हजर अजित पवारही उपस्तीत  होते.

दिल्लीत वेगवान घडामोडी घडत होत्या. पहाटेच राजभवनावर शपथविधीची तयारी झाली आणि सकाळी 8 च्या आत शपथविधी झालासुद्धा.

दरम्यान, ‘माझ्याकडे आत्ता सांगण्यासारखं पूर्ण काही नाही. अर्धवट माहिती मी देणार नाही. अजून चर्चा सुरू आहे. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी देईन,’ असं शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या बैठकीतून बाहेर पडताना उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here