एक शरद… सगळे गारद!; संजय राऊतांनी प्रसिद्ध केला मुलाखतीचा टिझर

0
169

मुंबई : महाविकास आघाडीचे जनक आणि राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार यांची सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीचा ट्रेलर त्यांनी नुकताच आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्या मुलाखतीचा टिझर प्रसिद्ध केला आहे.

ही एक धक्कादायक मुलाखत असेल, असं संजय राऊत यांनी जाहीर केलं होतं. राज्याच्या राजकारणासह अनेक धक्कादायक गोष्टींचा यातून खुलासा होईल, असं मानलं जात आहे.

संजय राऊत यांनी शरद पवार यांची मुलाखत घेतली असून एक शरद, सगळे गारद…! अशा मथळ्याखाली त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून या मुलाखतीचा टिझर प्रसिद्ध केला आहे.

ही मुलाखत तीन भागांमध्ये प्रसिद्ध केली जाणार आहे. तसंच या मुलाखतीचा पहिला भाग 11 जुलै रोजी शिवसेनेच्या मुखपत्रातून आणि डिजिटल माध्यमाद्वारे प्रसिद्ध केला जाणार आहे. तसंच त्यानंतर 12 आणि 13 जुलै रोजी या मुलाखतीचा दुसरा आणि तिसरा भागही पाहायला मिळणार आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“राजगृहावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध, आरोपींना कठोर शिक्षा व्हावी”

“…तरीही सरकार पाडण्याच्या मोहिमेतून फडणवीस व त्यांचे लोक माघार घ्यायला तयार नाहीत”

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान असलेल्या राजगृहावर अज्ञातांकडून तोडफोड

मुख्यमंत्र्यांसोबत अजित पवार आणि शिवसेना-राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांची बैठक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here