आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर येथे झालेल्या हिंसाचाराविरोधात निषेध म्हणून सत्ताधारी महाविकास आघाडीने आज महाराष्ट्र बंदची घोषणा केली होती. यावरून भाजप नेते व राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना आघाडी सरकारला खोचक सवाल केला होता.
महाविकास आघाडी सरकारने आज पुकारलेल्या बंदवरून खोचक प्रश्न विचारला आहे. कोणी मला माहिती देऊ शकेल का? आज वसुली चालू आहे का बंद?, असं अमृता फडणवीसांनी ट्विट केलं होतं. यावरून राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
वहिनींच्या गाण्यात सुरांचा जसा ताळमेळ नसतो तसं त्यांच्या बोलण्यात सुद्धा आजकाल काही ताळमेळ नसतो?? संवेदनाहिन मनाचं आणि अर्धवट ज्ञानाचं परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे अमृता वहिनी., असा टोला रूपाली चाकणकरांनी अमृता फडणवीसांना लगावला.
वहिनींच्या गाण्यात सुरांचा जसा ताळमेळ नसतो तसं त्यांच्या बोलण्यात सुद्धा आजकाल काही ताळमेळ नसतो??
संवेदनाहिन मनाचं आणि अर्धवट ज्ञानाचं परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे अमृता वहिनी. https://t.co/SdHZLYxPmp
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) October 11, 2021
महत्वाच्या घडामोडी –
मनसे शेतकरी हत्येला पाठिंबा देत आहे का?; राष्ट्रवादीचा मनसेला सवाल
“ठाकरे सरकारने दोन वर्षे महाराष्ट्र बंद केलाच आहे, आजचा फक्त अधिकृत”
“ठाकरे सरकारने दोन वर्षे महाराष्ट्र बंद केलाच आहे, आजचा फक्त अधिकृत”
आजचा महाराष्ट्र बंद पूर्णपणे फसला; चंद्रकांत पाटलांचा दावा