Home महाराष्ट्र अमृता फडणवीस म्हणाल्या, ‘मुंबईत ट्रॅफिकमुळे तीन टक्के घटस्फोट होतात’; आता किशोरी पेडणेकर...

अमृता फडणवीस म्हणाल्या, ‘मुंबईत ट्रॅफिकमुळे तीन टक्के घटस्फोट होतात’; आता किशोरी पेडणेकर म्हणतात…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे आणि ट्राफिकबाबत एक वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची आता राज्यभरात चर्चा सुरु झालीय. मी रोज सामान्य स्त्री म्हणून घराबाहेर पडते. त्यावेळी मलाही ट्रॅफिक आणि रस्त्यांवरील खड्ड्यांचा त्रास होतो. रस्त्यावर ट्रॅफिक आहे, खड्डे आहेत. ट्रॅफिकमुळे तीन टक्के घटस्फोट होतात. कारण आपण कुटुंबाला वेळ देत नाही, असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं होतं. त्यावर महापौर किशोरी पेडणेकर यांनी टीका केली आहे.

अमृता फडणवीस यांच्या दाव्यावर महापौर किशोरी पेडणेकर यांनी खोचक टीका केलीय. अमृता फडणवीस यांचा तर्क हास्यास्पद आहे. त्या दरवेळी ऐकावं ते नवलंच अशाप्रकारचं बोलत असतात. आता तर त्यांनी जावईशोध लावला आहे. त्यांच्या या वक्तव्यावर हसावं की रडावं असा प्रश्न मुंबईकरांना पडलाय, अशी टीका किशोरी पेडणेकर यांनी केलीय.

हे ही वाचा : यवतमाळ जिल्ह्यात शिवसेना पदाधिकाऱ्याची राहत्या घरात घुसून हत्या

दरम्यान, मी फडणवीसांची बायको आहे हे तुम्ही विसरून जा. मी सामान्य नागरिक म्हणून बोलते. मी रोज सामान्य स्त्री सारखी घराबाहेर पडते. त्यावेळी मलाही ट्रॅफिक आणि रस्त्यांवरील खड्ड्यांचा त्रास होतो. रस्त्यावर ट्रॅफिक आहे, खड्डे आहेत. ट्रॅफिकमुळे तीन टक्के घटस्फोट होतात. कारण आपण कुटुंबाला वेळ देत नाही. मुंबईत अनेक इश्यू आहेत. मेट्रो, रस्ते, एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न आहेत. त्याकडे लक्ष न देता सरकार खिसे भरू लागले तर त्यावर टीका होणारच. तुम्ही या मुद्द्यांवर लक्ष दिलं पाहिजे. ती मुंबईची गरज आहे, असं वक्तव्य अमृता फडणवीस यांनी केलं होतं.

महत्वाच्या घडामोडी –

 नितेश राणे प्रकृती बिघडली; रुग्णालयात केलं दाखल

“जिथं अन्याय तिथं रूपाली ताई, बंड्या तात्या कराडकर विरूद्ध पोलिसांत केला गुन्हा दाखल”

“शेतकरी कुटूंब मारहाण प्रकरणी मनसेची आक्रमक भूमिका, ठाकरे सरकारला दिला इशारा”