अमृता फडणवीस म्हणाल्या, माजी गृहमंत्री हनिमूनला गेले काय?; मनिषा कायंदे म्हणाल्या…

0
1961

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर निशाणा साधला.

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा सध्या काहीच पत्ता नाहीय. ते काय हनिमूनला गेलेत काय?, असा सवाल अमृता फडणवीसांनी केला होता. यावरून शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

हे ही वाचा : “मनसेत पक्षप्रवेशाचा धुमधडाका; सोलापुरातील असंख्य युवकांचा मनसेत प्रवेश”

तुम्हांला भाजपकडून आमदार व्हायचंय, त्यामुळे तुम्ही अस्वस्थ आहात. बरं राहिला प्रश्न देशमुखांचा तर तुमच्याकडे विविध तपास यंत्रणा आहेत, तुम्ही शोधू शकताय ना?, असा उलट सवाल मनिषा कायंदे यांनी केला.

सामनातून भारतीय जनता पार्टीवर टीका होत असताना अमृता वहिनी मात्र अस्वस्थ होतात. आमच्याकडे तर अशी माहिती आहे की, अमृता वहिनींना भाजपकडून आमदार व्हायचंय, प्रवक्ता व्हायचंय. त्यासाठी त्या भारतीय जनता पार्टीवर दबाव आणत आहेत, असा टोला मनिषा कायंद यांनी लगावला.

महत्वाच्या घडामोडी –

“नारायण राणेंच्या पोकळ धमक्यांना आम्ही घाबरत नाही, वेळ आल्यावर राणेंची कुंडली बाहेर काढू”

मुंबई महापालिकेचा पैसा शिवसेना पक्षनिधी म्हणून वापरतेय; मनसेचा आरोप

‘शिवसेनेच्या खासदारांनाच वाटतं की हे सरकार कधी पडतंय’; भाजपच्या ‘या’ नेत्याचा दावा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here