आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील सभेत बोलताना, मशिदीवरील भोंगे हटविण्याची भूमिका घेतली होती. राज यांच्या या घोषणनंतर उत्तर प्रदेश सरकारने प्रार्थनास्थळांवरील भोंगे विशेषत: मशिदीवरील अनधिकृत भोंग्याविरोधात कडक कारवाईला सुरुवात केली आहे. योगींच्या या निर्णयावरून राज ठाकरे यांनी योगींचं काैतुक केलं. आता या प्रकरणात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज ठाकरे यांनी राज्यातील सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना राज्यातील राज्यकर्ते हे भोगी असल्याचा टोला लगावला आहे. याचाच धागा पकडत अमृता फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडी सरकारवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.
“ऐ ‘भोगी’ काहीतरी शिक आमच्या ‘योगीं’कडून”, असं ट्विट अमृता फडणवीस यांनी केलंय. यामध्ये त्यांनी महाराष्ट्र हा हॅशटॅग वापरला आहे.
ऐ ‘भोगी’ , कुछ तो सीख हमारे ‘योगी’ से !#Maharashtra #thursdayvibes
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) April 28, 2022
महत्वाच्या घडामोडी –
शिवसेना-भाजप युतीसंदर्भात आशिष शेलारांचा मोठा गाैफ्यस्फोट, म्हणाले…
“हिंदूजननायक असा उल्लेख करत औरंगाबादच्या सभेसाठी पुण्यात जोरदार बॅनरबाजी; सभा होणार म्हणजे होणार?”
आपापसातील बंधुभाव कमी करण्याचं वक्तव्य करणं योग्य नाही; शरद पवारांची राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका