पुणे : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस वैफल्यग्रस्त अवस्थेत आहेत , असं वक्तव्य राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी केलं आहे.
भाजपचा पराभव झाला याचा अमृता फडणवीसांना धक्का बसला आहे. हा त्यांना मान्य होत नाही. त्यामुळे त्या वैफल्यग्रस्त अवस्थेत आहेत. आणि ठाकरे अडनावावरती टीका करावी इतकी अमृता फडणवीसांची उंची नाहीये. त्यांनी ती करुही नये, अशी टीका रुपाली चाकणकर यांनी केली आहे.
अमृता फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्र्यांची पत्नी म्हणून महाराष्ट्राच्या जनतेला काय योगदान दिलं आहे, असंही त्या म्हणाल्या.
दरम्यान, स्वत:चे छंद जोपासण्यासाठी त्यांचे 5 वर्ष गेली आहेत. त्यांनी त्या अँगलमध्येच राहावं, असंही रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
-रोहित पवारांना मंत्रिपद द्या; पक्षातील तरुणांचं शरद पवारांना पत्र
-‘या’ कारणामुळे दिपीका पुन्हा झाली भावूक
-गृहखातं राष्ट्रवादीला देऊ नका नाहीतर… चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला प्रेमाचा सल्ला
-भारताशी युद्ध करण्यासाठी आमचं सैन्य तयार- इम्रान खान