आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नांदेड : शरद पवार यांना पंतप्रधान तर, अजित पवारयांना एक दिवस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करायचे आहे, अशी इच्छा राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी काल चिंचवड येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलून दाखवली. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते नांदेड येथे माध्यमांशी बोलत होते.
अजितदादांच्या मुख्यमंत्रिपदाविषयी कुणी स्वप्न बघत असेल तर त्याला आमची काहीही हरकत नाही. स्वप्न कोणीही बघू शकतं. परंतु या तिन्ही पक्षात समन्वय नाही हे मी पूर्वीपासूनच सांगत आलोय. त्यांच्या मधील समन्वयाच्या अभावमुळे त्यांच्या-त्यांच्यामध्येच अडचणी निर्माण होत आहे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
महाविकास आघाडीत समन्वय नाही, इथपर्यंत ठीक आहे पण यांच्या समन्वयाच्या अभावामुळे जनतेला नाहक त्रास होतोय, त्याचं काय करणार? असा सवाल करत त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.
महत्वाच्या घडामोडी –
पालघर जिल्हा परिषदेत मनसेचा झेंडा फडकवण्यासाठी राज ठाकरेंचे शिलेदार मैदानात
“…म्हणून मी फडणवीसांना म्हणालो होतो, काहीही करा, पण शरद पवारांचा नाद करू नका”
जेव्हा निवडणूक लागेल, तेव्हा…; अशिष शेलारांचा अजित पवारांना इशारा
“मुख्यमंत्री पदावर असो वा नसो, आजही शेतकऱ्यांना फडणवीसांचा आधार वाटतो”