पुणे : राष्ट्रवादीचे नेते खासदार डॉ. अमोल कोल्हे हे सध्या क्वारंटाइनमध्ये आहेत. करोना पॉझिटिव्ह असलेल्या दोन नेत्यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी स्वतःला क्वारंटाइन करण्याचा निर्णय घेतला.
“मी एक डॉक्टर असल्यानं परिस्थितीचं गांभीर्य ओळखत आपल्या कुणाचे आरोग्य धोक्यात येऊ नये, या भावनेतून होम क्वारंटाइन राहण्याचा निर्णय घेतला आहे,” अशी माहिती डॉ. कोल्हे यांनी ट्विट करून दिली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे यांच्यानंतर अमोल कोल्हे हे करोना पॉझिटिव्ह निघालेल्या दोन नेत्यांच्या संपर्कात आले होते. त्यानंतर त्यांनी स्वतःला क्वारंटाइन करून घेतलं आहे.
जय शिवराय!
नमस्कार,
आपल्याला एक महत्वाची माहिती शेअर करत आहे.एक जुलै ते चार जुलै या कालावधीत मतदारसंघाच्या दौऱ्यावर होतो. दौऱ्याच्या काळात संपर्क आलेले दोन राजकीय नेते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे कळाले. हे समजल्यानंतर मी स्वत:ची कोरोना चाचणी करुन घेतली असून ती निगेटिव्ह आलेली आहे.— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) July 8, 2020
महत्वाच्या घडामोडी-
“राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही”
सामना’ची भूमिका रोज बदलते, कधी पवारांच्या बाजूने कधी राज्यपालांच्या- देवेंद्र फडणवीस
राजगृह निवासस्थान तोडफोडप्रकरणी प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया; केलं शांततेचं आवाहन
अजित पवारांचा छत्रपती संभाजीराजे भोसले यांना फोन; केली ‘ही’ महत्वाची विनंती