आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : राज्यात विधानसभा निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. अशातच भाजपच्या पहिल्या फळीतील नेते आणि राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांचे टेन्शन कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजपच्याच नेत्याने वाढवले आहे. माजी नगरसेवक आणि भाजप नेते अमोल बालवाडकर यांनी कोथरूडमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन करत चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात आरपारची लढाई सुरु केली आहे.
कोथरूड मतदारसंघाचे भाजपाचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी बालेवाडी येथे मेळाव्याचं आयोजन केलं होतं. यावेळी हजारो नागरिक उपस्थित होते. अमोल बालवडकर यांनी बालेवाडी येथे मोठं शक्तिप्रदर्शन केलं. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मतदार संघातील घरकाम करणारे, वडापाव विकणारे, कामगार, कष्टकरी, तसेच महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना थेट स्टेजवर बोलावून त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी अमोल बालवडकर म्हणाले की, “कोथरूड विधानसभा मतदारसंघातून मी जेव्हा इच्छुक झालो तेव्हापासून आमच्या पक्षाचे नेते चंद्रकांत पाटील तसेच पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते हे कार्यक्रमाला येत नाहीत. लोकसभेत पक्षाचं काम करत असताना जनतेत गेलो तेव्हा लोक म्हणाले की, भाऊ तुम्हाला विधानसभा निवडणूक लढायची आहे. मग मी पक्षाकडं उमेदवारी मागितली. पक्षाच्या नेत्यांना सांगितलं की, मला माहित आहे कोणाला उमेदवारी मिळणार आहे. पण मला इच्छुक म्हणून राहु द्या. उद्या निवडणुकीत मी तुमचंच काम करणार आहे. पण जेव्हा मी इच्छुक झालो तेव्हा आमच्याच पक्षाचे नेते म्हणाले तू इच्छुक कसा राहिला, आत्ता तुला पक्षातून काढून टाकणार आहे. मी काय गुन्हा केला का, मी तर फक्त इच्छुक आहे म्हणून माझ्या कार्यक्रमाला यायचं नाही. कोणालाही पाठवायच नाही असं सुरू आहे. तरी मी आज माझ्या कोथरूड मतदारसंघातील मायबाप जनतेलाच प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदाराचं महिलांबाबत बोलताना वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले…
अजित पवार गटाला धक्का! दिलीप वळसे पाटील पुन्हा शरद पवार गटात जाणार?
मला घडवण्यामध्ये शरद पवारांचा मोठा हात आहे – सुशीलकुमार शिंदे